पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे.  पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवत पराभवाची मालिका यंदा बंद केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याचा बाजीराव कोण याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होतील. १६२ जागांसाठी पुण्यात ५५.५० टक्के मतदान झालं होतं. यंदाच्या निवडणुकीत मतदानही वाढलं त्याचा फायदा भाजपला होतांना दिसत आहे.


गेल्या १५ वर्षापासून पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पुण्यात भाजपने चांगलं यश मिळवलं होतं.  सगळ्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी येथे प्रचारसभा घेतल्या. अजून कोणालाही पूर्णबहुमत मिळालेलं नाही पण यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसतांना दिसत आहे.