बुलडाणा : शेगाव विकास आराखड्यांतर्गत शहरात विविध विकास कामं संथगतीनं सुरु आहेत. याचा निषेध, बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेसनं चक्क नागिन डान्स करुन केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक रस्त्यालगतच्या फुटपाथवर टाईल्स बसवायचं काम, कंत्राटदार ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होतं. पण इतर कामं संपवून इगल कपंनीचे अधिकारी निघून गेले आहेत. त्यामुळे हे अपूर्ण काम कोण करणार याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीनं शासकीय विश्रामगृह गाठलं. 


तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांची, विकास आराखडा संबंधी बैठक सुरु होती. त्यात आधी अधिका-यांना हार श्रीफळ देऊन नंतर अचानकपणे नागिन डान्स करत राष्ट्रवादीनं आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं.