नाशिक : नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा तर 1 लाख 80 हजार रुपयाच्या जुन्या 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकरी आणि भुजबळ यांचा कट्टर समर्थक छबू नागरे नाशिकमधील वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील अशांचा समावेश आहे.


बनावट नोटा देऊन नव्या चलनातील नोटा घेण्याचा गोरखधंदा नाशिक मध्ये चालू होता, त्यात 11 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचे 4, नाशिकचे 5 ठाण्याचा एक आणि पुण्यातील एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.