नागपूर : पोलिसांना त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा भरोसा असायला हवं असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुन्ह्यात पीडित महिलांसाठी नागपूर पोलिसांनी सुरु केलेल्या भरोसा सेलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. सध्या स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईम वाढतोय. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे गुन्ह्यांचे प्रकार तीव्रतेनं बदलत असताना पोलिसांनी ही स्वतःला बदलणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांविरोधात नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह नागपूरच्या सहा आमदारांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचा आरोप केला होता. तर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही पोलिसांना खडे बोल सुनावले.


नागपुरात काही प्रकरणात पोलिसांची कारवाई सोनाराने काटेकोरपणे सोनं मोजावे अशी होती... मात्र, काही प्रकरणात काटेकोरपणे कारवाई करण्यापेक्षा समजूत घालणे गरजेचे असते असे गडकरी म्हणाले... मात्र, पोलिस समजूत घालण्यापेक्षा अतिरंजित कारवाई करत आगीत तेल ओतते असे गडकरी म्हणाले.