नागपूर : हिंदू समाजापासून ज्यांची नाळ तुटलेली आहे अशांना हिंदू समाजात पुन्हा जोडण्यासाठी संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे. नागपुरात आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभ या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मसंस्कृती महाकुंभ या कार्यक्रमाचं आयोजन देशासाठी महत्वपूर्ण असून हजारो वर्षांपासून आपला देश हा संतांच्याच मार्गदर्शनावर चालत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.