धुळे : जिल्ह्यात अशी अनेक गावात आहेत ज्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या एक पेक्षा जास्त योजना अथवा विहिरी अस्तित्वात आहेत. तरीही सबंधित गावांत तीव्र पाणी टंचाई आहे. पण तरीही राजकीय पुढारी नवनव्या योजना आणून स्वतःचे खिसे गरम करून घेताना दिसताहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातलं सोनगीर हे २० ते ३० हजार लोकवस्तीचं मोठं गाव. गावालागत जामफळ, सोनवद अशी दोन धरणं आहेत. या दोन्ही धरणांवर गावाला पाणीपुरवठा करणा-या योजना अस्तित्वात आहेत. तर पाचहून जास्त विहिरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी खणल्या गेल्या आहेत. या सर्वांवर एक कोटींपेक्षा जास्त खर्च झालाय. तरीही गावात तीव्र पाणी टंचाई आहे. 


गावाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होतोय, मात्र उपयोग शून्य आहे. धरणात पाणी टाकूनही ते तापमानामुळे आणि जमिनीत मुरल नसल्यामुळे सोनगीरला त्याचा फायदाच झाला नाही. आडात नाही तर पोहऱ्या कुठून येणार असा सवाल ग्रामस्थांचा आहे. 


गावालगत मोठ्या प्रमाणात पडिक जमीन आहे, छोट्या टेकड्या आहेत. या टेकड्या हिरव्या करण्याचं, बांध बांधण्याचे कष्ट ग्रामस्थ दाखवत नाहीत. 


सोनगीर हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. राज्यात अशी अनेक गाव आहेत जिथे पाणी पुरवठा योजना असूनही पाणी नाही. म्हणून लोकांनी एकत्र येत लोकसहभागातून, श्रमदानातून पाणी अडवणं, जिरवणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.