नाशिक : पाणीटंचाई पाठोपाठ आता नाशिकमध्ये साथींच्या रोगांचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहरात पाणी कपात सुरु असल्यानं नागरिक पाणी साठवून ठेवतायेत. मात्र ह्याच साठविलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांची उत्पती होणायची भीती मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाई सुरु आहे. घरोघरी मिळेल त्या भांड्यात, बादलीत, टाकीत पाणी साठवून ठेवल जात आहे. हेच साठवलेलं पाणी डासांच्या उत्पत्तीला, साथीच्या रोगांना आमंत्रण ठरण्याची भीती खुद्द महापालिका प्रशासनानेच व्यक्त केलीय. 


नागरिकांनी जास्त दिवस पाणी साठवून न ठेवता त्याचा लवकरात लवकर उपयोग करावा अशा सूचना नाशिक महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. 
धरणातच पाणीसाठा कमी असल्यानं महापालिकेनच पाण्याची बचत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी साठवून कमीतकमी वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. मात्र डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वर्षभरापासून बंद असलेली धूर फवारणी सुरू करावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. 


दरवर्षी एन पावसाळ्यात महापालिकेकडून डासांची उत्पती रोखण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जाते. गच्चीवर, टायरमध्ये उघड्या भांड्यामध्ये साचलेल्या पाण्यातून डासांची उत्पत्ती होते.  मात्र आता पाणी साठविल्या शिवाय पर्यायच नसल्यानं मनपा प्रशासन संभाव्य साथीच्या आजारांवर कशी मात करणार याकडे नाशिककरांच लक्ष लागलंय.