ठाण्याचा बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण, महिलेवर खंडणी मागितल्याचा आरोप
उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता
ठाणे : उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेनं 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, यातले 95 हजार घेताना रंगेहात अटक करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे.