राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेत्या निलेशचं भावासह अपहरण!
पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या नीलेश भिल या चिमुरड्याचं त्याच्या भावासहीत अपहरण करण्यात आलंय.
जळगाव : पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या नीलेश भिल या चिमुरड्याचं त्याच्या भावासहीत अपहरण करण्यात आलंय.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील नीलेश भिल याच्यासह त्याच्या लहान भावाचं अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या आईनं नोंदवलीय. मुक्ताईनगर पोलिसांत ही तक्रार दाखल करण्यात आलीय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोथळी येथील नीलेशची आई सुंदरबाई रेवाराम भिल (वय ३०) यांच्या फिर्यादीनुसार, नीलेश (१२ वर्ष) आणि त्याचा लहान भाऊ गणपत भिल्ल (७ वर्ष) या दोघांचं अज्ञातांकडून अपहरण करण्यात आलंय.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक वंदना सोनुने यांच्याकडे सोपवण्यात आलाय. बुडणाऱ्या मुलास जीवदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा चौचा विद्यार्थी असलेल्या नीलेश भिल याची २०१५ साली राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. निलेशला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाला होता.