आळंदी :  महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाच्या कामगिरीचे आज महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. या पथकाने कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीला फास्ट ट्रॅक कोर्टात अवघ्या १३ दिवसात शिक्षा झाल्याची महाराष्ट्रातील पहिली घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळंदीतील इंद्रायणी तिरावर २ सप्टेंबर रोजी साध्या वेशातील महिला पोलीस फिरत होती. या महिला पोलिसाच्या मागे परमेश्वर दगडू साहेब माने हा व्यक्ती तब्बल अडीच तास घिरट्या घातल होता. या महिला पोलिसांनी आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावून या व्यक्तीला अटक केली आणि त्याच्यावर कारवाई केली. 


या व्यक्ती विरोधात ३५४ कलमातंर्गत करावाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी न्यायाधिशांनी १३ दिवसात म्हणजे आज १६ सप्टेंबरला निकाल देऊन आरोपीस सहा महिन्यांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणुन अनिल चुकेवाड यांनी कामकाज पाहिले.


या आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात आरोपपत्र  करण्यात आला. एरवी ९० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येते.  निर्भया पथकामार्फत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला होता.