मुंबई : सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आयोजित मराठा समाजाकडून होणाऱ्या विक्रमी शक्तिप्रदर्शानामुळे घाबरलेल्या सरकारकडून मोर्चात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मोर्चा आयोजकानी नियोजनाच्या भानगडीत न पडता थेट दिवस जाहीर करावा असे आवाहन राणे यांनी केलं.


मोर्चा आयोजकांकडून मागणीचे निवेदन पालक मंत्र्यानी स्वीकारण्याच्या नव्या पायांडयावर राणे यांनी आक्षेप नोंदवला आहे. मोर्चा सरकारच्या धोरणाविरोधात असल्यानं पालक मंत्र्यांनी निवेदन स्वीकारु नये अशी भूमिका त्यांनी मांडली.