नागपूर : भाजप-शिवसेनामधील आरोप-प्रत्यारोप अधिक गडद होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना पक्ष नेतृत्व टक्केवारीत अडकले आहे, असा थेट आरोप गडकरी यांनी केला. त्यामुळे आता शिवसेना गडकरींना काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट नाव घेतले नाही. मात्र, पक्षनेतृत्वाकडे बोट दाखवून उद्धव यांच्यावर निशाणा साधला. उद्धव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटबंदीवरुन टार्गेट केल्याने भाजपने आक्रमकपणा धारण केला आहे. आता गडकरी यांनी शिवसेनेवर घणाघात केलाय.


प्रादेशिक पक्षांची मोट बांधता, पण दिल्लीत तुम्हाला विचारतं कोण, अशा खडा सवाल गडकरी यांनी शिवसेनेला विचारला आहे. त्यामुळे ही टीका सेनेला लागण्याची शक्यता आहे. दिल्लीत शिवसेना सत्तेत सहभागी आहे. त्यांना विचारत घेत नसल्याचे गडकरी यांनी सूचीत केले आहे.