नागपूर :  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मुलगी केतकी आणि समाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेड़ीकर यांचा मुलगा आदित्य यांचा  विवाह सोहळा आज नागपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी आज नागपुरात अनेक राजकीय नेते, उद्योगपती उपस्थित आहेत.


 नागपुर - वर्धा मार्गावरील 'एम्प्रेस पेलेस' मध्ये आज सकाळी हा विवाह सोहळा पार पडला. सोहळ्यासाठी आसाम राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केंद्रीय मंत्री वैंकेया नायडू , प्रकाश जावड़ेकर, मनसे चीफ राज ठाकरे, भाजप प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे, महादेव जानकर, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, संघ प्रमुख मोहन भगवत, राज्यसभा खासदार व् एस्सेल समुहचे प्रमुख सुभाष चंद्रा यांनी या सोहळ्यास हजेरी लावली.