पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीही नाही आणि युतीही?
सत्तेत असून ही शिव सेना भाजप मध्ये सुरु असलेला वाद, काँग्रेस राष्ट्रवादीत पराकोटीला गेलेला संघर्ष यामुळं आगामी महापालिका निवडणुकात युती आणि आघाडी होणार का याबाबत साशंकता असली तरी, पिंपरी चिंचवड मध्ये मात्र आघाडी आणि युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलीय...!
कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : सत्तेत असून ही शिव सेना भाजप मध्ये सुरु असलेला वाद, काँग्रेस राष्ट्रवादीत पराकोटीला गेलेला संघर्ष यामुळं आगामी महापालिका निवडणुकात युती आणि आघाडी होणार का याबाबत साशंकता असली तरी, पिंपरी चिंचवड मध्ये मात्र आघाडी आणि युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलीय...!
पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीच्या सत्तेला खऱ्या अर्थानं आव्हान द्यायचं असेल तर भाजप शिवसेना युती होणं गरजेचं आहे. पण भाजप आणि सेनेने शहरातील सर्वच जागांसाठी इच्छूकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केल्याने युती होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय.. पण युती न होण्यासाठी हे एकमेव कारण नाही..! मुळात महापालिकेच्या १२८ जागांसाठी गेल्या वेळी युती मध्ये भाजपला अवघ्या ४७ जागा मिळाल्या होत्या तर शिव सेनेला ७५ आणि ३ जागा आर पी आय ला होत्या.. त्यात भाजप ला ३ च जागांवर विजय मिळाला होता तर शिव सेनेन १४ जागांवर विजय मिळवला होता...! पण आता परिस्तिथी बदललीय..! लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या मूळ भाजपचे दोन आमदार शहरात आहेत आणि ते केवळ ४७ जागांवर समाधान मानतील ही शक्यता नाही. त्यांचा हा युक्तिवाद तोडण्यासाठी शिव सेनेकडेही दोन खासदार आणि एक आमदार आहे, आणि मुळात शिव सेना अधिक ताकतवान असल्याचा दावा शिव सेना आज ही करतेय, त्यामुळं भाजप आणि सेनेची युती महापालिका निवडणुकात होईल असं जाणकारांना वाटत नाही...!
शिवसेना भाजप प्रमाणेच शहरात राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची युती होण्याची शक्यता नाही. मुळात गेल्या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्वतंत्र लढले होते. त्यात राष्ट्रवादीला ८३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला अवघ्या १४ जागा...! गेल्या निवडणुकात काँग्रेसला २८ ठिकाणी उमेदवार ही मिळाले नव्हते..आता निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या तगड्या ७ स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीने नुकताच पक्षात प्रवेश दिलाय...! त्यामुळं काँग्रेस ची ताकत जवळपास संपुष्टात आलीय..अश्या स्तिथीत आघाडी करण्याचे एक ही कारण नाही म्हणूनच शहरात आघाडी होणार नाही अशीच स्तिथी आहे...!
सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक नेते युती आणि आघाडी बाबत उघड पणे बोलायला तयार नाहीत...पण शहरातील सर्वच स्थानिक नेत्यांमध्ये वाढत चाललेली कटुता, त्यांची वाढत चाललेली महत्वाकांक्षा आणि एकूण राजकीय परिस्तिथी पाहता शहरात युती ही नाही आणि आघाडी ही नाही असंच चित्रं आहे...!