नागपूर : भाजपची यादी लांबणीवर पडली आहे. पार्लमेंट्री बोर्डची बैठक परत रात्री 8 वाजता होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. मात्र, अद्याप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. दरम्यान, गडकरी मुख्यमंत्री बैठकीत १०० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र उमेदवारांची लिस्ट जाहीर होणार नाही, असे भाजपकडून सांगण्यात आलेय. बंडखोरी टाळण्यासाठी केवळ एबी फ़ॉर्म दिले जाणार आहे. गेले दीड तास बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री आणि गडकरींसह ६ आमदारांच्या बैठकित १०० नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 


महानगरपालिका निवडणुकिकरता नामांकन अर्ज दाखल करण्याकरता केवळ 36 तास शिल्लक असतानाही, नागपुरात प्रमुख राजकीय पक्षांनी अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने काही निवडक यादी जाहीर केली असली तरीही काँग्रेस, भाजप, सेनेची यादी अद्याप गुलदसत्यातच आहे. विदर्भात नागपूर, अकोला आणि अमरावती येथे निवडणुका होणार असून बहुतेक राजकीय पक्ष आज यदीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.


महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्याकरिता राजकीय पक्ष जाणून-बुजून ही यादी जाहीर करत नसल्याची चर्चा संभाव्य उमेदवारांमध्ये आहे.