मुंबई : बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी एसीबीने ठाणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. एकूण ३० हजार पानांचं हे आरोपपत्र आहे. १० जणांविरोधात एसीबीनं हे आरोपत्र दाखल केलं आहे. हे १० जण कंत्राटदार आणि अधिकारी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफ ए कंनस्ट्रक्शन आणि एफ ए एटंरप्रायजेसचे फतेह खत्री, निसार खत्री, अबीद खत्री आणि झाहीद खत्री यांना यात आरोपी बनवण्यात आलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या आरोपत्रात अजित पवार यांचं नाव नाही मात्र अजित पवारांना क्लीन चिट दिली नसल्याचं एसीबीनं सांगितलं आहे. अजित पवार यांची चौकशी सुरु असल्याचंही एसीबीनं म्हंटलं आहे.