पुणे : पुण्याच्या येरवाडा तुरुगांतून १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्तची आज अखेर सुटका झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय दत्तने आपली बॅग खाली ठेवली आणि तेथील तिरंग्याला सलाम केला. 


यादरम्यान पत्रकारांशी बोलताना आझादी इतनी आसान नही थी, दोस्तो असं म्हटलं. आता चार्टड विमानाने संजय मुंबईत येणार आहे.



मुंबईत परतल्यावर तो सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहे. त्यानंतर आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण करण्यास जाईल. 


अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा आठ महिन्यांनी कमी करण्यात आली.