भाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही.
नाशिक : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही.
उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे. विजयाची शक्यता गृहित धरुनच भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय. तसंच अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जातेय.