नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट
शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे.
(योगेश खरे, झी मीडिया) नाशिक : नोटाबंदीनंतर नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळतो. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या जवळपास 70 ते 75 टक्के एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 85 कोटी रुपये होते. त्यानंतर विकेंड आल्याने हा पैसा 60 कोटींहून कमी झाला आहे.
जिल्ह्यातील एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अशी मागणी करण्यात आलीय. दुपारनंतर एटीएममध्ये पैसे येतील आणि व्यवहार सुरळीत होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरी चलन तुटवडा संपावा अशी मागणी नाशिककरांनी केलीय. कारण बँकेतही पैसे नसतील तर नाशिककरांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.