नागपूर : पुढच्या वर्षी नागपूर निवडणुका होणार आहेत... तोंडावर आलेल्या या निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू झालीय. ठिकठिकाणी भाजपचे होर्डिंग्ज जागा अडवून बसलेले दिसत आहेत. पण, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या पोस्टर्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा मात्र गायब आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रमध्ये भाजप सरकार आहे. नागपुरात यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर 100 जागांवर तरी विजय मिळवण्याचा चंगच भाजपनं बांधलाय. 


नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात दिसत असलेल्या भाजपच्या पोस्टरांवरून मोदींचा चेहरा का गायब झाला असावा? याबद्दल आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात. या पोस्टर्सवर मोदींऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे फोटो दिसत आहेत. 


या स्थानिक निवडणुका असल्यानं पोस्टर्सवर नागपूरच्या स्थानिक नेत्यांना जागा दिल्याचं भाजप नेते सांगत आहेत. परंतु, नागपूर हा आरएसएसचा गडदेखील मानला जातो, त्यामुळे मोदींचा चेहरा पोस्टर्सवर न दिसण्यामागे आणखी काही कारणं आहेत का? याबद्दलही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.