नाशिक : रेल्वे प्रशासन रेल्वे रॅक उपलब्ध करून देत नसल्याने शेतकऱयांच्या खळ्यावर मोठा प्रमाणावर कांदा पडून आहे. रेल्वे रॅकच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा थेट परिमाण शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.


तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा जाळण्यास सुरूवात केली आहे, काही शेतकऱ्यांनी शेतातच कांदा जाळण्यास सुरूवात केली आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा आता परवडेनासा झाला आहे.