नागपूर : विदर्भाच्या राजकारणात शिवसेना-मनसेला मोजत नसल्याचा टोला विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंनी लगावला आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आपले 'शत्रू नंबर एक' असल्याचंही अणे म्हणाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी नगरपालिका निवडणुक वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर लढविण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशीं चर्चा करण्यासाठी ऍड. अणे आज अकोल्यात आले होते. या निवडणूकीत अणे यांचा 'विदर्भ राज्य आघाडी' हा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.


दरम्यान, विदर्भाचा मुद्दयावर भाजपसह काँग्रेसने संदिग्ध भुमिका घेतल्याचा आरोप करतांना अणे यांनी करतांनाच केंद्रीयमंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.