पुणे : पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाचा फायदा पुणेकरांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे पुण्यात गेल्या चार दिवसांमध्ये एकही घरफोडीची तक्रार दाखल झाली नसल्याचं वृत्त टाईम्सनं दिलं आहे.


घरफोडीबरोबरच चोरीच्या इतर घटनांचं प्रमाणही कमी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाला दोन ते तीन घरफोडीच्या घटना घडतात पण नोटबंदी झाल्याचा असा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे.