ठाणे : स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 17 मार्च, 2017 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून शनिवार दिनांक 18 मार्च, 2017 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सकाळी 9.00 पासून रात्रौ 9.00 पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादि परिसरात पाणी पुरवठा बंद राहिल व शुक्रवारी रात्रौ 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 पर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा,  शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहिल.  शुक्रवार दिनांक 17 मार्च, 2017 रोजी सकाळी 9.00 ते शनिवार दिनांक 18 मार्च, 2017  रोजी सकाळी 9.00 वाजे पर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.