नाशिक : जिल्ह्यात पावसानं उशिरा सलामी दिली असली तरी पर्जन्यमानात सातत्य पाहायला मिळतंय.. गेल्या 24 तासात नाशिकमध्ये 8.1 मिमी तर शनिवारी संध्याकाळपर्यंत जवळपास 27.9 मिमी पावसाची नोंद झालीय.. आठ दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं पेरणीच्या कामांना सुरुवात झालीय... तसंच धरणातल्या पाणीसाठ्यातही वाढ होते आहे.


गेल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असून 15 ते 20 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली होती. आता मात्र आठ दिवसांच्या पावसामुळं गंगापूर धरणातील पाणीसाठा 3 टक्क्यांनी वाढलाय. त्यामुळं नाशिककरांचं पाणीसंकट तूर्तास टळलंय.. पावसाचा जोर बघता धरणातील पाणी पातळीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त होतोय.