मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही- राहुल
आरएसएस आणि सत्ताधारी भाजपला माहित आहे की, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही.
नागपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले होते, यावेळी त्यांनी नागपुरातच 'आरएसएस'समोर आव्हान ठेवलं, काहीही झाले तरी मी मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही, आणि या देशाला कधीही झुकू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आरएसएस आणि सत्ताधारी भाजपला माहित आहे की, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही, त्यामुळे हे लोक हात धुवून माझ्या मागे लागतात, असे राहुल यावेळी म्हणाले.
नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.