रत्नागिरी : नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचीच अधिक ओढाताण होत आहे. मात्र 50 दिवसांनी परिस्थिती सुधारेल, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास दाखवून 50 दिवस संपेपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर नोटबंदीवर बोलेन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर-मुंबई समद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.  येत्या शनिवारी शहापूरजवळच्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार आहे. महामार्गाला शिवसेनेचा विऱोध नाही, पण बळीराजावर अन्याय होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे.  


याप्रकरणी आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी महामार्गाची कुणकुण लागल्यावर आसपासच्या जमीनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. आता उरलेल्या जमिनीही सरकार प्रकल्पासाठी घेणार असेल, तर नागरिकांनी खायचं काय? असा सवाल शहापूर तालुक्यातले शेतकरी विचारत आहेत. आता याप्रश्नी उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले आहेत.