नोटाबंदीमुळे कृषिअर्थव्यवस्थेला फटका - शरद पवार
हे सरकार संपूर्ण सहकारी अर्थव्यवस्था उध्दवस्त करायला निघालंय, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
बारामती : नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था दगावल्यासारखीच परिस्थिती असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कृषी अर्थव्यवस्थेवर होत आहे. हे सरकार संपूर्ण सहकारी अर्थव्यवस्था उध्दवस्त करायला निघालंय, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
नोटबंदीला आता पन्नास दिवस झालेत. पण आणखी काही महिने ही परिस्थिती राहील, असं पवार म्हणाले. बारामतीत 24 व्या नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस अर्थात बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं उदघाटन झालं, त्यावेळी शरद पवार होलत होते.