राज्यातल्या सर्व शाळांच्या बाहेर तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय
राज्यातल्या सर्व शाळांच्या बाहेर तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्यानं घेतला आहे.
दीपाली पाटील, झी २४ तास, मुंबई : राज्यातल्या सर्व शाळांच्या बाहेर तक्रार पेटी बसवण्याचा निर्णय शालेय शिक्षण खात्यानं घेतला आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षकांना आपल्या तक्रारी करण्यासाठी योग्य वाव मिळणार आहे.
यासंदर्भात जीआर काढण्यात आलाय. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तक्रार पेटी मुख्याध्यापक, पोलीस प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येणार आहे.
ज्या तक्रारी शासन स्तरावर सोडवायच्या आहेत त्या शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसंच लैंगिक तक्रारी महिला तक्रार निवारण समितीकडे देण्यात येणार आहेत.