कृउबा निवडणुकीत आता थेट शेतकरी मतदान करणार
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सरपंच, व्यापारी, विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही.
धुळे : शेतकऱ्यांच्या हितासाठी कायद्यात बदल करत येणाऱ्या काळात राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सरपंच, व्यापारी, विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही.
या ऐवजी जज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणार असल्याच मत राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
सदाभाऊ खोत धुळे जिल्ह्या दौऱ्यावर आले असता बोलत होते. ६० वर्षे सत्तेत असतांना विरोधकांवर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ का आली असा सवाल यावेळी उपस्थित करत मंत्री खोत यांनी विरोधकांना चिमटा काढला.