आता एनआयए आणि एटीएसही करणार या घटनेची चौकशी
प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी मध्य रेल्वेवरच्या दिवा-मुंब्रादरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवलेला आढळून आला होता.
ठाणे : २४ जानेवारी २०१७ च्या रात्री प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी मध्य रेल्वेवरच्या दिवा-मुंब्रादरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवलेला आढळून आला होता.
दुर्घटना घडवण्याच्या दृष्टीकोनाने हा रॉ़ड ठेवण्यात आला होता का याची चौकशी सुरू आहे, या मागे दहतवादी संघटनेचा हात तर नाही ना, ही देखील शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.
या घटनेची चौकशी रेल्वे पोलिसांसह, NIA आणि ATS पथक करत आहे. त्यामुळे या संबंधी सध्या कुठलंही विधान करता येत नसल्याचं, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगितलं आहे.
ही घटना अपघात नसून ठरवून केल्याचा संशय पोलिसांना होता, त्यानुसार या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी या दिशेने आपला तपास सुरू केला होता, आता या घटनेची चौकशी रेल्वे पोलिसांसह एनआयए आणि एटीएस देखील करत आहे.