पुणे  : व्हॉटस अॅप आणि फेसबुकच्या संगतीने वाढणाऱ्या पिढीसाठी ही बातमी तशी वेदनादायी नाही, पण ज्याच्या कानावर लहानपणापासून रेडिओच्या बातम्यांचे शब्द पड़ले, हे शब्द ऐकत जे मोठे झाले, जगात काय चाललंय हे ऐकून ज्याच्या माहितीत भरपडली अशा पिढीसाठी ही एक धक्कादायक बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण ....प्रादेशिक बातम्या देत आहेत, हे वाक्य आणि बातम्या आता त्यांच्या कानी पड़णार नाहीय. 


काळाच्या ओघात हे होतंय असं म्हणायला जागा असली, तरी पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातम्या बंद करण्यामागे खर्च हे कारण नक्कीच नसावं. पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या अख्खा महाराष्ट्र ऐकत होता.


महाराष्ट्रात अनेक जण या बातम्या ऐकून सकाळी-सकाळी अपडेटेड होत असत. तेच बातमीपत्र आता अचानक बंद करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.


हे बुलेटीन बंद झाल्याने मनसेने आंदोलन पुकारले असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने निदान त्या रेडिओ आणि दूरदर्शनसोबत वाढलेल्या पिढीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण अनेकांना आजही हे १० मिनिटाचं बुलेटीन चुकवलं तरीही दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.


केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर मंगळवारी एक आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यात पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे  श्रीनगर आणि कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. तसेच वृत्त विभागात नवीन पदे भरली जात नसल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.