ओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडण्याचा इशारा
ठाणेकरांसाठी `ओला` कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे : ठाणेकरांसाठी "ओला" कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ठाण्यातील सर्वच रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या ओला कंपनीच्या सेवेला विरोध केलाय. ओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडू असा निर्धार रिक्षा युनियन द्वारे करण्यात आला. रिक्षा-टॅक्सी युनियनच्या या विरोधानं ठाण्यात ओला कंपनी आणि रिक्षा-टेक्सी युनियनमध्ये संघर्ष अटळ असल्याचं चित्र दिसत आहे.
इतर रिक्षांच्या पेक्षा वेगळी सुविधा देण्यासाठी एका अॅपची सुरुवात केली असली तरी ठाण्यातील रिक्षा चालक आणि मालक प्रणित संघटनांनी विरोध केल्यामुळे भविष्यात वातावरण तापणार असल्याचं चिन्ह आहे.