ठाणे :  ठाणे वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतले असून एका वाहनातून ही रक्कम घेऊन जात होते. 


यापूर्वी ४ मार्च रोजीही भारतीय चलनातून रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या  एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयांच्या नोटा ठाणे सोनसाखळी विरोधी पथकाने  जप्त केल्या. गुन्हा शाखेने खारेगाव रेतीबंदर रोड या ठिकाणावरून गुप्तपणे सापळा रचून एका आरोपीसह नोटा  जप्त केल्या होत्या.