पुणे : संथ वाहणारी इंद्रायणी आणि त्या कडेला असलेलं ज्ञानेश्वरांचं समाधी मंदिर. मोक्षाच प्रवेशद्वार असलेल्या याच आळंदीमध्ये एका आजी बाईंची एक वेगळीच साधना सुरु आहे…! आळंदीतल्या रिक्षा स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये एक रिक्षा जरा हटके आहे. कारण गेली तीस वर्ष ही रिक्षा एक महिला चालवतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या रिक्षावाल्या बाई आहेत सत्यभामा घोडके. यांचं वय ५० वर्ष. आज आळंदी मध्ये त्यांना रिक्षावाल्या आजीबाई म्हणून ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील आजारी होते आणि त्यांना उपचारासाठी पुण्यात न्यावं लागायचं मात्र रिक्षावाल्यांच्या मुजोरी मुळे त्यांना अनेक संकटांना समोरं जावं लागलं. मग अखेर त्यांनी स्वत: रिक्षा चालविण्याचं मनावर घेतलं आणि असा सुरु झाला या आजीबाईंच्या रिक्षा चालविण्याचा प्रवास


आळंदी मधल्या रुग्णांना पुण्यात पोहोचण्याच्या उद्देशानं हा व्यवसाय सुरु केल्या नंतर सत्यभामा यांनी पुण्यात ही रिक्षा चालवायला सुरुवात केली. ७ वर्ष पुण्यात रिक्षा चालवल्यानंतर त्यांनी आळंदी मध्येही त्यांनी रिक्षा चालवायला सुरु केली. सध्या त्या दिवसाला २०० ते ५०० रुपये त्या कमावतात…!मात्र, हा सगळा प्रवास सोपा नव्हता...त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला...पण, त्यांनी ही अडथळ्यांची शर्यत सहज पार केली.


सत्यभामा घोडके या १९९० पासून रिक्षा चालवतायंत. शहरात महिलांनी गाडी चालवणं कौतुकास्पद असले तरी त्या काळी आळंदी मध्ये रिक्षा चालवण नक्कीच धाडसी पाऊल होतं. नेहमीच्या वाटा सोडून काही तरी वेगळ करण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.


पाहा व्हिडिओ