नागपूर : ओमर खालिदनं जहाल नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ओमर खालिद जहाल नक्षलवादी हेम मिश्र याची गळा भेट घेताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर मध्यवर्ती कारागृहातून ८ सप्टेंबरला हेम मिश्र सुटल्यानंतर तुरुंगाच्या दारासमोरच ओमर आणि त्याच्या इतर समर्थकांनी जंगी स्वागत केलं. त्याचे फोटो काढले आणि त्याचा व्हिडीओही तयार केला. 


हेम मिश्रा हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला नक्षल समर्थक प्रोफेसर साईबाबाचा कुरियर म्हणून काम करायचा. त्याला गडचिरोलीमधून पोलिसांनी अटक केली होती. 



दरम्यान, कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ओमर खालिद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. देशविरोधी घोषणाबाजीसंदर्भात कन्हैय्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी केवळ व्हिडिओ फूटेजच नव्हे तर प्रत्यक्षदर्शीही पुरावे म्हणून असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


कन्हैया सध्या तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. याच प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत. त्यापैकी ओमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांनी काल रात्री उशिरा पोलिसांसमोर शरणगती पत्करली. त्यामुळे दोघांसोबत समोरासमोर चौकशी करण्यासाठी कन्हैयाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलीय.