वसई : वसईत डॉ. देवेंद्र पाटील यांनी एका रुग्णाच्या पोटातून चक्क एक किलो वजनाचा मूतखडा ऑपरेशन करून बाहेर काढला आहे. या घटनेची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद व्हावी, म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. 
  
वसईच्या नायगावमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर हे ७२ वर्षाचे गृहस्थ लघवीच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. एक्सरेमध्ये हा मूतखडा आढळून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर सर्जरी केल्यावर हा एवढा मोठा मूतखडा पाहून डॉक्टरही हैराण झाले. याचं वजन एक हजार १०० ग्रॅम म्हणजे १ किलोहून अधिक आहे. या मूतखड्याचा आकार १३.५ सेंटीमीटर बाय ९ सेंटीमीटर आहे.


विशेष म्हणजे, हे ऑपरेशन डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होतं. कारण रुग्णाला हृदयविकाराचाही त्रास आहे. तसंच त्या  रुग्णाचं मूत्राशय कृत्रिम होतं.


तरीही डॉक्टरांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. तर एवढ्या मोठ्या वजनाचा मूतखडा भारतात तरी अजून सापडला नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.