नागपूर : पेईंग गेस्ट ठेवण्याच्या व्यावसायिक स्पर्धेतून नागपूरमध्ये एकाची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. किशोर पाटील असं मृत व्यक्तीचे नाव आहे. नागपूरच्या शिवणगाव परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. देशाच्या विविध भागातून इथं प्रशिक्षणार्थी येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षणाच्या कालावधी दरम्यान ते या परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहतात. मृत किशोर पाटील आणि आरोपी रणधीर सिंह हे याच कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची सोय उपलब्ध करुन देत होते. पेईंग गेस्ट म्हणून आपल्याकडे खेचण्यासाठी या दोघांमध्ये तीव्र व्यावसायिक स्पर्धा होती.


याच स्पर्धेतून दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. या मारहाणीत किशोरच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रणधीरनं पळ काढला होता. आरोपी बिहारचा रहिवासी असल्याने पोलिसांनी सापळा रचून रणधीरला अटक केली आहे.