रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांचा रास्ता रोको
कांदा उत्पादक शेतक-यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
नाशिक : कांदा उत्पादक शेतक-यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये इतका अत्यल्प भाव देण्यात आल्याने लहान कांद्याचा लिलाव न करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्यानं शेतकरी संतापले.. कांद्याचे भाव कोसळल्यानंतर नाशिकमध्ये सलग दुस-या दिवशी शेतक-यांनी रस्त्यावर कांदे फेकून संताप व्यक्त केला.
या आंदोलनामुळे मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.. गुरुवारी सटाणा तालुक्यातल्या नागपूर-पिंपळगाव इथे शेतक-यांनी रस्त्यावर कांदे फेकले होते. कांद्याला जास्त भाव दिला जात नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला होता.
अखेर बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कांद्याला भाव वाढवून देण्याचा आणि लहान कांद्यालाही लिलावात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.