नाशिक : येथील रुग्णालयांमध्ये बोगस ऑक्सिजन वापरला जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. याप्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनानं पर्दाफाश केला असून आरोपींना गजाआड केलंय. नाशिकमधल्या रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणारं तब्बल दीड लाख रुपये किमतीचं बोगस ऑक्सिजन जप्त करण्यात आलंय. 


सिन्नरमध्ये बोगस ऑक्सिजन सिलेंडर बनविणा-या टोळीला जेरबंद करण्यात आलंय. सिन्नरमधल्या ब्राम्हणवाडीत स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स नावानं हे ऑक्सिजन बनवण्यात येत होतं.