मराठा क्रांती मोर्चापासून न्यायमूर्ती सावंतांची फारकत
राज्यभरात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी आता या विषयातून अंग काढून घेतलय. या मोर्चाचं आयोजन करणारी जी समिती आहे.
पुणे : राज्यभरात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी आता या विषयातून अंग काढून घेतलय. या मोर्चाचं आयोजन करणारी जी समिती आहे.
त्या समितीशी आपला संबंध उरला नसल्याचं त्यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केलय. या समितीच्या कार्यपद्धतीवर सावंत यांनी आक्षेप घेतलाय. आपण समितीच्या बैठकांना उपस्थित नसताना आपल्या परस्पर काही निर्णय घेतले गेले त्याचप्रमाणे सरकारला मागण्यांची निवेदने दिली गेली याविषयी सावंत यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळेच आपण मराठा क्रांती मोर्चापासून बाजूला होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित नेत्यांनी मात्र हे आक्षेप अमान्य केलेत. मुळात अशी कुठली विशिष्ट समितीच तयार करण्यात आली नव्हती , त्यामुळे कोणी समितीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. न्यायमूर्ती सावंत यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करून घेण्याची आमची भावना होती. त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन अपेक्षित होतं. मात्र त्यांनी गैरसमज करवून घेतल्याचं स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आलय.