नांदेड :  पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नांदेडमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमधील नगरोटा येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लढतांना नांदेड जिल्ह्यातील जाणापुरीचा जवान संभाजी कदम शहीद झाला.


ही वार्ता नांदेडमध्ये कळताच जाणापुरी गावात शोककळा पसरली... नांदेडमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच शहीद संभाजी कदम यांनी श्रद्धांजली वाहिली.


पाकिस्तानला आणखी एकदा धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात आणखी एकदा सर्जिकल स्ट्राईक करावी अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली.