जितेंद्र शिंगाडे, झी मिडिया, नागपूर : मोठ्या नोटा बंद झाल्यावर होणा-या समस्येपासून वाचण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अगदी चहा वाल्यापासून ते पान टपरी चा व्यवसाय करणारे छोटे दुकानदार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत... हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर नागपूरच्या विनय सोनकुसरे या पानटपरी चालकाने यावर उपाय काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या गांधीबाग वस्तीतील 'लखन पान मंदिराच्या मालकाला पाचशे आणि  हजाराच्या जुन्या नोटा बंद झाल्यावर सुटे पैसे मिळणे कठीण झाले.. मात्र पानाचे शौकीन असलेले ग्राहक आजही  पानाचा आस्वाद घेत आहेत. सुट्या पैशांची त्यांना काळजी देखील नसते.. कारण पान टपरीचे बिल ते आता पेटीएम च्या माध्यमातून देत आहेत. 


नोट बंदी झाल्यावर सर्वात जास्त परिणाम छोट्या दुकानदारांवर झाला... मोठे दुकान आणि शॉपिंग मॉल्समध्ये डेबिट आणि क्रेडीट कार्डची कॅशलेस सुविधा ग्राहकांनी निवडली...  मात्र सुटे पैसे नसल्याने छोट्या दुकानदारांना याचा फटका बसला व ग्राहकी कमी झाली... मात्र ई-वॉलेट मुळे अशा छोट्या दुकानदारांना आपला धंदा सुरळीत ठेवण्यास मदत होताना दिसतेय...


सरकारने अचानक घेतलेल्या नोट बंदीचा निर्णयाचा अनेकांना फटका बसला.. मात्र असेही अनेकजण आहेत जे यातून मार्ग काढून आपला व्यवसाय व्यवस्थित करीत आहेत...विनय देखील त्यातीलच एक...आणि अशा  ई-वॉलेट मुळे रोख रकमेच्या तुटवड्यावर एक उपाय ग्राहक आणि दुकानदारांना मिळाला आहे.