कोल्हापूर : कोल्हापुरची पंचगंगा नदी यावर्षी दुस-यांदा पात्राबाहेर पडलीय. गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांनी वाढ झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल राजाराम बंधा-याची पातळी 23फूट इतकी होती ती आज 34.6 फुटावर गेलीय. जिल्ह्यात गेले चार दिवस संततधार सुरूच आहे. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या  प्रमाणात वाढ झालीय. 


पंचगंगा नदीवरील प्रमुख 7 बंधा-यांसह जिल्ह्यातील एकूण 36 बंधारे पाण्याखाली गेलेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 43 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय. गगनबावडा  तालुक्यात सर्वाधिक 102 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. 


धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ होतीय. कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे राधानगरी धरण 99 टक्के इतकं भरलय. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे.