ठाणे : दिवंगत पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले य़ांचे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी ४ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. 


पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या निधनानंतर निर्मलाताई यांनी त्याच्या कार्याचा वसा सुरुच ठेवला होता. स्वाध्याय परिवारासाठी निर्मलाताईंनी पांडुरंगशास्त्रींना मोलाची साथ दिली. निर्मालाताईंच्या जाण्याने स्वाध्याय परिवारातील सदस्यांवर शोककळा पसरलीये. 


प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या पांडुरंग शास्त्री आठवले यांना १९९६ मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसंच याच वर्षी यांना भारत सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसंच १९९२ मध्ये आठवले यांना मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.