बीड : बीडमधील राष्ट्रवादीचे नेते पंडित अण्णा मुंडे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासहीत प्रज्ञा मुंडे,अजित पवार,निरंजन डावखरे, राजेश टोपे, पाशा पटेल तसंच अनेक आजी - माजी आमदार - मंत्री हजार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून परळी येथे जाऊन पंडित अण्णांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांची गळाभेट घेऊन सांत्वन केलं.


परळीनजिक असलेल्या कान्हेरवाडी इथं पंडित अण्णांवर अंत्यसंस्कार पार पडले. धनंजय मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.   


गुरुवारी, ७५ वर्षीय पंडित अण्णा मुंडे यांचं निधन झालं. बीड जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष होते.