सोलापूर : अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आल्याने वाद निर्माण झाला. या ठिकाणी तणाव असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत वाहतूक रस्ते रोखून धरलेत. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमाआधी वाद उफाळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूरातल्या माळशिरस पंचायत समितीच्या नवीन कार्यालय लोकार्पण सोहळ्यावेळी मोठा वाद झाला. यावेळी अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोनशिला काढण्यात आली. त्यानंतर वाद निर्माण  झाला.


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. रस्तेही अडविलेत. बंदचे आवाहनही राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्याआधी माळशिरसमधले वातावरण तापले आहे. रस्त्यांवर टायरही जाळण्यात आलेत.