बीड : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळीमधल्या सर्वच्या सर्व म्हणजे 6 जागांवर भाजपचा पराभव झालाय. जिल्हा परिषदेतही भाजप बहुमतापासून दूरच आहे. या जनमताच्या कौलानंतर बीडमधलं धनंजय मुंडेंचं वाढतं वर्चस्व निकालामुळे स्पष्ट होतंय.


परंतु, खरा प्रश्न आहे तो हा की पंकजा मुंडे यांनी राजीनामा दिला तरी मुख्यमंत्री तो स्वीकारणार का?


काही दिवसांपूर्वीच 'या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असलं तरी भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांच्या पदाला धक्का लावणार का? त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचं धाडस मुख्यमंत्री करणार का? राज्यातील जातीय समीकरणं, मुंडे या नावाचा पश्चिम भागातील दबदबा लक्षात घेतलं तर हे केवळ राज्यातील दबावाचं राजकारण ठरू शकतं, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.