बीड :  मी मंत्री आहे, जबाबदार नागरिक आहे, त्यामुळे नियमाबाहेर जाऊन काही करणार नाही.  नेहमी प्रमाणे जाणार आणि दर्शन घेणार , नियमात असेल ते करणार, नियमाबाहेर जाऊन काहीच करणार नाही, असे पहिल्यांदा भगवानगडावरील वादग्रस्त दसऱ्या मेळाव्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. गडाच्या आतमध्ये दसरा मेळाव्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे. भगवान गडावर राजकीय भाषण करणार नाही. सामाजिक संदेश देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावरून त्या भगवानगडावर दसरा मेळाव्याला परवानगी नसली तरी जाणार असल्याचे स्पष्ट केले. 


नामदेव शास्त्री आणि माझ्यात काही घडलं नाही. मला काही आठवत नाही.  हा वाद का सुरू झाला हे मला माहिती नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगतिले. 



मी नेहमी प्रमाणे  भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी यंदाही मी जाणार आहे.  भगवान गडावर विरोध करण्यासाठी, मला सिद्ध करण्यासाठी तेथे जायचे नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  


माझ्या पेक्षा वडीलधारी माणूस  भगवान बाबांच्या गादीवर आहे. त्यामुळे भगवानबाबांच्या गादीचा मी सन्मान करते. तेथून माझा काहीजण विरोध करत असेल तर त्यावर प्रतिक्रिया जाहीरपणे  देणे मला योग्य वाटत नाही. मी हे टाळले आहे, हे मला भगवान बाबांनी शिकवलं नाही किंवा माझ्या बाबांनी (गोपीनाथ मुंडे) शिकवलं नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.  


यापूर्वी मी भगवानबाबांचे दर्शन आणि मुंडे साहेबांच्या भाषणासाठी दरवर्षी गडावर जात होते. भगवानबाबा आणि मुंडे साहेबांचे भाषण हे समिकरण होते.  त्यामुळे दसऱ्याला भगवान गडावर जाण्याची परंपरा आहे. ती मी पूर्ण करणार आहे.