मुंबई : थकबाकीदार छोट्या शेतक-यांना अटक करता. मग मोठ्या धेंडांना पोलीस का अटक करत नाहीत? असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित पीक विमा वाटप कार्यक्रमात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. 


गृह खात्याच्या कारभारावर आपणच नाही तर न्यायालयानंही ताशेरे ओढल्याकडे यावेळी पंकजा मुंडेंनी लक्ष वेधलं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याचाही कारभार आहे. त्यामुळे गृह खात्याच्या कारभारावर सवाल उपस्थित करत, पंकजा मुंडेंनी नव्या वादाला तोंड फोडलंय.